Ticker

20/recent/ticker-posts

Important Info : तुमच्या आधार नंबर नोंदणीकृत असलेले सर्व नंबर जाणून घ्यायचे आहेत का ? Want to know how many mobile numbers are linked to your Aadhaar card ?

Photo © Copyright 

मित्रांनो आजचा हा विषय आपल्या साठी खूपच जास्त महतावाचा आहे कारण हा विषय खूपच गंभीर आहे यामुळे आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा खूप मोठा फरक पडतो. वर दिलेल्या शीर्षकानुसार तुम्हाला माहितीच असेल की आज आपण कोणत्या विषयासाठी बोलत आहोत.

आधार नंबर द्वारे जाणून घ्या आत्तापर्यंतचे तुमचे सर्व मोबाईल नंबर्स

 

आपण आत्तापर्यत किती मोबाईल नंबर घेतले असतील हे आपल्यालाच माहिती नसते. एखाद्या वेळेस होत काय आपण एखादा मोबाईल नंबर घेतो आणि कालांतराने आपला मोबाईल हरवतो किंवा सीम कार्ड खराब होऊन जाते. तर मग अश्या वेळेस काय करतो दुसरा सीम कार्ड विकत घेतो. व हरवलेल्या नंबरची कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाही . किंवा संबंधित कंपनीत जाऊन ते बंदही करत नाही. व अश्यातच तो नंबर आपल्याच नावावर नोंदणीकृत असतो. 

नको असलेले मोबाईल नंबर बंदही करू शकतात 

व त्याचा दुसरा कुणीतरी गैरवापर करतो व त्याचा संपूर्ण आरोप आपल्यावर लागतो.तर अश्या वेळेस आपल्याकडे दुसरा काही मार्ग नसतो त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय यावर उपाय ज्यामुळे आपल्याला कळू शकेल की आपल्या आधार नंबर वर किंवा आपल्या नावावर कोणकोणते सीम कार्ड्स चालू आहेत. चला तर मग वेळ न गमावता आपण आपल्या विषयाला सुरवात करूया......

Photo © Copyright 

वरील प्रकारे आपली फसवणूक व्हायला नको पाहिजे म्हणून दूरसंचार विभागाने (DoT) आपले सर्व मोबाईल नंबर तपासण्यासाठी तसेच मानवी व्यक्तींना फसवेगिरी पासून सावध करण्यासाठी एक सेवा पोर्टल सुरु केलेले आहे . ज्याद्वारे तुम्ही तुमचे सर्व सीम कार्ड्स तपासू शकता. व अनावश्यक असलेले सीम कार्ड्स तुम्ही येथून बंदही करू शकता. त्यामुळे तुम्ही हा लेख व्यवस्थित वाचा समाजाला नसेल तर खाली दिलेल्या व्हिडियोत सुद्धा तुम्हाला हि प्रक्रिया कशी करायची आहे. ते दाखवण्यात आलेले आहे.

सध्या हि सेवा काही राज्यांमध्येच सुरु आहे पण लवकरच हि सेवा पोर्टल सर्व राज्यांमध्ये सुरु करण्यात येईल अशी आशा आहे. चला तर मग नक्की काय आहे ती प्रोसेस जाणून घेऊया....

प्रक्रिया

  1.  तुमच्याकडे स्मार्टफोन ,अन्द्रोइड , टेब , संगणक किंवा डेस्कटॉप असेल तर गुगल क्रोम मध्ये खालील लिंक उघडा. https://tafcop.dgtelecom.gov.in/  
  2. समोर दिसत असलेल्या स्क्रीनवर तुमचा मोबाईल नंबर टाका. 
    Photo © Copyright 

  3. त्यानंतर तुम्हाला एक OTP प्राप्त होईल तो त्या ठिकाणी प्रविष्ट करा. 
    Photo © Copyright 


  4. OTP प्रविष्ट केल्यावर खाली दिलेल्या VALIDATE या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचे सर्व मोबाईल नंबर्स तुम्हाला दिसायला लागतील.



  5. त्यानंतर तुम्हाला जर एखादा नंबर ब्लॉक करायचा असेल तर तुम्ही वर दिलेल्या स्क्रीननुसार Name Of User मध्ये तुमचे नाव व त्यानंतर खाली This Is not My Number वर क्लिक करा व टिक करून त्याखाली दिलेल्या रिपोर्ट या बटनावर क्लिक करा. 
  6. त्यानंतर तुम्हाल एक रिपोर्ट नंबर मेसेजच्या स्वरुपात येईल. त्या नंबरला वापरून तुम्ही तुमचे स्टेटस जाणू शकता. तुमचा नंबर बंद झाला की नाही यासाठी तुम्हाला आलेला मेसेजमधला नंबर खाली दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करा . व Track/Cancel यावर क्लिक करा. 
    Photo © Copyright 

  7. त्यानंतर टेलिकॉम विभागाकडून तुमचा नंबर तपासणी करून तो ब्लॉक करण्यात येईल. 


धन्यवाद अश्याच प्रकारचे लेख व फायदेशीर माहिती साठी आम्हाला ब्लॉगर व युवत्युब वर सबस्क्राइब करा................ पुन्हा भेटूया नवीन माहितीसह...........